सलमान, शिल्पाविरोधात वरळी पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:08 AM2017-12-28T05:08:05+5:302017-12-28T05:08:17+5:30

मुंबई : अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मेहतर समाजाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची तथाकथित क्लीप व्हायरल झाल्यानंतर मेहतर समाजामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Complaint against Salman and Shilpa in Worli police | सलमान, शिल्पाविरोधात वरळी पोलिसांत तक्रार

सलमान, शिल्पाविरोधात वरळी पोलिसांत तक्रार

Next

मुंबई : अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मेहतर समाजाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची तथाकथित क्लीप व्हायरल झाल्यानंतर मेहतर समाजामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी भारतीय सफाई कामगार संघटनेने बुधवारी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.
सोनवणे यांनी सांगितले की, मेहतर समाजाबाबत हीन शब्द वापरत सलमान व शिल्पाने समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती सुधारणा अधिनियम २०१५ अंतर्गत कारवाई करण्याची तक्रार वरळी पोलिसांत केली आहे. पोलीस आयुक्तांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी सलमान व शिल्पा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली नाही, तर मेहतर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Complaint against Salman and Shilpa in Worli police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.