Join us

सलमान, शिल्पाविरोधात वरळी पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 5:08 AM

मुंबई : अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मेहतर समाजाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची तथाकथित क्लीप व्हायरल झाल्यानंतर मेहतर समाजामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबई : अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मेहतर समाजाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची तथाकथित क्लीप व्हायरल झाल्यानंतर मेहतर समाजामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी भारतीय सफाई कामगार संघटनेने बुधवारी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.सोनवणे यांनी सांगितले की, मेहतर समाजाबाबत हीन शब्द वापरत सलमान व शिल्पाने समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती सुधारणा अधिनियम २०१५ अंतर्गत कारवाई करण्याची तक्रार वरळी पोलिसांत केली आहे. पोलीस आयुक्तांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी सलमान व शिल्पा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली नाही, तर मेहतर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :सलमान खानशिल्पा शेट्टी