चेंबूरच्या सेंट सॅबेस्टीअन शाळेतला प्रकार
मुंबई : शाळेत मस्ती करणा:या नववीतल्या विद्यार्थिनीला मारहाण करणा:या मुख्याध्यापिकेविरोधात आरसीएफ पोलिसांनी अदखलपात्र तक्रार (एनसी) नोंदविली आहे. चेंबूरच्या सेंट सॅबेस्टीअन शाळेत हा प्रकार घडला.
चेंबूरच्या मारवली चर्च परिसरात योगिता म्हात्रे ही मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून सॅबेस्टीअन शाळेत नवव्या इयत्तेत शिकते. 1 डिसेंबर रोजी
नेहमीप्रमाणो शाळेत गेलेली योगिता मैत्रणींसोबत मस्ती करत होती. त्यांची मस्ती मुख्याध्यापिकेने पाहिली. मुलींना शिस्त लागावी, अशा प्रकारची मस्ती करू नये हा धडा अन्य विद्याथ्र्यानाही मिळावा यासाठी मुख्याध्यापिकेने मस्ती करणा:या विद्यार्थिनींना काठीने बदडले. काठीचा फटका योगिताच्या हाताच्या नसेवर बसला आणि तिचा हात सुजला. घरी गेल्यानंतर पालकांनी योगिताचा सुजलेला हात पाहून विचारणा केली. तेव्हा योगिताने घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी लागलीच तिला उपचार देऊ
केले. पाचेक दिवस लोटले तरी हाताची सूज उतरलेली नाही.
तसेच योगिता या मारहाणीमुळे भलतीच घाबरलेली असून शाळेत जाण्यास नकार देत आहे, अशी माहिती पालक देतात. या मारहाणीबाबत पालकांनी शाळा प्रशासनाकडे विचारणा केली.
मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्यावर एनसी दाखल केली. पालक या मुख्याध्यापिकेची बदली करावी, अशी मागणी शाळेकडे करत आहेत. या प्रकरणी मुख्याध्यापिकेविरोधात एनसी नोंदविल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप राऊत यांनी दिली. (प्रतिनिधी)