Join us

रुग्णासोबत फोटो अपलोड करणाऱ्याविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 5:37 AM

भायखळा येथील खासगी रुग्णालयातील डॉ. विकी घेवरचंद जैन यांनी रुग्णासोबताच फोटो फेसबुकवर अपलोड केला.

मुंबई : भायखळा येथील खासगी रुग्णालयातील डॉ. विकी घेवरचंद जैन यांनी रुग्णासोबताच फोटो फेसबुकवर अपलोड केला. या पोस्टमध्ये ‘हा रुग्ण ६० टक्के भाजला होता, मात्र प्लास्टीक सर्जरीनंतर सुखरूप घरी जातोय’ अशा संदेशासह अपलोड करण्यात आला होता. परंतु, सोशल मीडीयावर अशा पद्धतीने रुग्णाचा फोटो पोस्ट करणे चुकीचे असल्याची बाब अधोरेखित करत माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी डॉ.जैन यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार केली आहे.कोठारी यांनी अशा प्रकारे रुग्णालयात रुग्णासोबत फोटो काढणे, त्यात रुग्णाचा चेहरा न झाकल्याने ओळख उघडकीस येणे, हा फोटो डॉक्टरच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकांऊटवर पोस्ट करणे या सगळ््या चुकीच्या बाबी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.शिवाय, अशा प्रकारच्या पोस्टमुळे रुग्णाला मानसिक ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा आरोपही केला आहे. डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे करण्यात आली आहे. या डॉक्टरचा परवाना किमान सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.