Join us

ओशिवरा येथे बोगस मतदान झाल्याची तक्रार

By रेश्मा शिवडेकर | Published: May 20, 2024 5:57 PM

ओशिवरा म्हाडा येथील १५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर १० ते १२ जणांच्या नावाने आधीच कुणीतरी मतदान केल्याची तक्रार आहे.

मुंबई : ओशिवरा म्हाडा येथील १५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर १० ते १२ जणांच्या नावाने आधीच कुणीतरी मतदान केल्याची तक्रार आहे. त्यामुळे ज्यांच्या नावाने अन्य कुणी मतदान करून गेले त्यांचे बॅलेटवर मतदान घेण्यात आले. हा बोगस मतदानाचा प्रकार असल्याची तक्रार मनसेचे नेते संदेश देसाई यांनी केली आहे. या ठिकाणी पंकज सिंग यांना त्यांच्या नावावर अन्य कुणी मतदान करून गेल्याचे समजले. त्यांनी हा प्रकार केंद्राबाहेर मतदारांच्या मदतीकरिता उपस्थित असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातला. त्यांच्याप्रमाणे आणखी १० ते १२ जणांच्या  बाबतीत असे घडल्याची तक्रार आहे.

मनसेचे नेते संदेश देसाई यांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर सिंग यांना बॅलेटद्वारे मतदान करण्याची संधी देण्यात आली. अन्य तीन जणांनाही बॅलेटवर मतदान करण्याची संधी देण्यात आली. मात्र अन्य व्यक्ती मतदान न करताच निघून गेल्याचे देसाई यांनी सांगितले. हा बोगस मतदानाचा प्रकार असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान