सोसायटीची आयुक्तांकडे  बिल्डरविरोधात तक्रार, प्रदूषण रोखण्यासाठी इमारतीचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 10:09 AM2023-11-06T10:09:18+5:302023-11-06T10:23:34+5:30

बांधकाम करताना प्रदूषण करणाऱ्या एका बिल्डरच्या विरोधात विक्रोळीतील एका गृहनिर्माण संस्थेने पालिकेकडे तक्रार केली आहे.

Complaint of society to commissioner against builder, initiative of building to prevent pollution | सोसायटीची आयुक्तांकडे  बिल्डरविरोधात तक्रार, प्रदूषण रोखण्यासाठी इमारतीचा पुढाकार

सोसायटीची आयुक्तांकडे  बिल्डरविरोधात तक्रार, प्रदूषण रोखण्यासाठी इमारतीचा पुढाकार

मुंबई : प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईकरांकडूनही सकारत्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. बांधकाम करताना प्रदूषण करणाऱ्या एका बिल्डरच्या विरोधात विक्रोळीतील एका गृहनिर्माण संस्थेने पालिकेकडे तक्रार केली आहे.
इमारत क्रमांक- ९८ (मातोश्री सीएचएस) पुनर्विकास बांधकामादरम्यान क्रीपा इलाईट बिल्डर नियमावलीचे उल्लंघन करत असल्याची तक्रार कल्पवृक्ष सहकारी गृहनिर्माण संस्थेने ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  अशी तक्रार आहे. 

तक्रारीत काय?
बांधकामादरम्यान धुळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बिल्डरने राज्य सरकार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष तसेच महापालिकेच्या नियमांची पायमल्ली चालवली आहे, इमारतीच्या सभोवताली संरक्षक भिंत नाही. विकासकाने मलनिस्सारण व्यवस्था योग्य न केल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. पादचारी मार्गावर ते साचून राहते. बांधकामाच्या ठिकाणी काम रात्री उशिरा सुरू असते किंवा सकाळी लवकर सुरू होते. व्यावसायिकाला योग्य ती समज द्यावी, असे संस्थेच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Complaint of society to commissioner against builder, initiative of building to prevent pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.