Join us

शासकीय काम वेळेत होत नाही, अशी करा ऑनलाइन तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:07 AM

सध्या ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आल्या आहेत. 

मुंबई : शासकीय काम वेळेत होत नसल्यास ‘आपले सरकार’ या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करता येते. २१ दिवसांत या तक्रारींचे निवारण करणे अनिवार्य आहे. आजघडीला विविध विभागांच्या मिळून ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आल्या आहेत. 

ऑनलाइन पर्याय :

  कोणतेही शासकीय काम वेळेत होत नसल्यास अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या तुमच्या मोबाइल किंवा संगणकाद्वारे ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.

  तुम्ही केलेल्या तक्रारीचे ऑनलाइन स्टेटससुध्दा चेक करू शकता. 

  शासनाच्या अधिकृत आपले सरकारच्या पोर्टलवर निःशुल्क कोणत्याही विभागाची तक्रार ऑनलाइन करू शकता. 

  अगदी सरपंचपासून ते मंत्रालय विभागापर्यंत  तक्रारी करू शकता.

१२ महिन्यांत ५ हजार तक्रारी :

आजघडीला विविध विभागांच्या मिळून ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आहेत. राज्यभरातून या तक्रारी केल्या जातात. त्याची २१ दिवसात दखल घेणे गरजेचे असते.

११ हजार तक्रारींचे निराकरण :

संकेतस्थळावर राज्याच्या कोनाकोपऱ्यातून १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आल्या. या सर्व तक्रारींची पडताळणी करून यापैकी ११ हजार तक्रारींचे निवारण झाले आहे.  

तांत्रिक अडचणीत हेल्पलाइन उपलब्ध :

ऑनलाइन तक्रारी केल्यानंतर किंवा आपली काही अडचण असल्यास आपण या नंबरवर फोन करून  १८००१२०८०४० या हेल्पलाइनवर मदत घेता येते.

सर्वाधिक तक्रारी पोलिस, नगर विकासच्या :

संकेतस्थळावरील १ लाख ४५ हजार तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी पोलिस विभागाच्या २२ हजार ५७५ आणि नगरविकास विभागाच्या १८ हजार २०३ आहेत.

टॅग्स :मुंबईराज्य सरकार