‘एडीजी’विरुद्ध तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवला
By admin | Published: February 19, 2015 02:47 AM2015-02-19T02:47:30+5:302015-02-19T02:47:30+5:30
राज्य गृहरक्षक दलातील उप महासमादेशक सुरेंद्र कुमार यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेचा जबाब कुलाबा पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.
मुंबई : राज्य गृहरक्षक दलातील उप महासमादेशक सुरेंद्र कुमार यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेचा जबाब कुलाबा पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. या जबाबाची शहानिशा झाल्यानंतर तक्रारीवर योग्य ती कारवाई होणार आहे.
अपर महासंचालक दर्जाचे अधिकारी असलेले सुरेंद्र कुमार गेल्या सुमारे दीड वर्षापासून होमगार्ड विभागात कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलीस दलात कारकून म्हणून काम करणाऱ्या महिलेने कुलाबा पोलिसांकडे त्यांच्याविरोधात तक्रार दिली. कुमार यांनी विनयभंगासह फोन करून खासगी बाबींची विचारपूस केल्याचा आरोप या महिलेने केला होता. मात्र कुलाबा पोलिसांनी गुन्हा नोंदविलेला नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवून घेतला आहे. जबाबात तिने सांगितलेल्या घटना, घटनाक्रम, फोन तपशील या सर्व बाबींची शहानिशा केली जाईल.(प्रतिनिधी)