विमानतळावर व्हीलचेअरची सुविधा नाकारल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 05:05 AM2018-09-23T05:05:28+5:302018-09-23T05:05:43+5:30

अमेरिकेतून मुंबईत आलेल्या महिला प्रवाशाचा पाय दुखत असल्याने त्यांनी विमानाचे तिकीट आरक्षित करताना व्हीलचेअरची सुविधा पुरवण्याची मागणी केली होती. मात्र, मुंबई विमानतळावर ही सुविधा पुरवण्यात आली नाही

Complaint of wheelchair access denied at the airport | विमानतळावर व्हीलचेअरची सुविधा नाकारल्याची तक्रार

विमानतळावर व्हीलचेअरची सुविधा नाकारल्याची तक्रार

Next


मुंबई : अमेरिकेतून मुंबईत आलेल्या महिला प्रवाशाचा पाय दुखत असल्याने त्यांनी विमानाचे तिकीट आरक्षित करताना व्हीलचेअरची सुविधा पुरवण्याची मागणी केली होती. मात्र, मुंबई विमानतळावर ही सुविधा पुरवण्यात आली नाही, अशी तक्रार या महिलेने मुंबई विमानतळ प्रशासन व लुफ्तान्सा कंपनीकडे नोंदवली आहे.
लुफ्तान्सा कंपनीच्या विमानाने लॉस एंजिलिस येथून फ्रँकफर्टमार्गे मुंबईत आलेल्या फर्जाना फझलभाय या महिला प्रवाशाने ही तक्रार केली आहे. विशेष म्हणजे त्यांना लॉस एंजिलिस व फ्रँकफर्ट या दोन्ही ठिकाणी व्हीलचेअरची सुविधा पुरवण्यात आली होती.
२० सप्टेंबरला मुंबई विमानतळावर विमानातून बाहेर पडताना हा प्रकार घडला. फ्रँकफर्ट येथून फ्लाइट क्रमांक एलएच ०७५६ या विमानाने त्या मुंबईत आल्या. मात्र मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी व्हीलचेअरची सुविधा नाकारल्याची तक्रार महिलेची आहे. तर महिलेच्या हातातील सामान ७ किलोपेक्षा जास्त असल्याने नियमानुसार सुविधा नाकारण्यात आल्याचे मुंबई विमानतळ कर्मचाºयांकडून सांगण्यात आले.

Web Title: Complaint of wheelchair access denied at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.