Join us

मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये अन्नाविषयी तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 1:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलुंडच्या मिठागर येथील कोविड सेंटरमध्ये मागील काही दिवसांपासून चांगल्या दर्जाचे अन्न मिळत नसल्याच्या तक्रारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलुंडच्या मिठागर येथील कोविड सेंटरमध्ये मागील काही दिवसांपासून चांगल्या दर्जाचे अन्न मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या कोविड सेंटरमध्ये जेवण करण्यासाठी चांगले अन्न न मिळाल्यामुळे येथील रुग्ण आपल्या नातेवाइकांना घरून जेवणाचा डबा आणण्यास सांगत आहेत. लोक आपल्या उपचार घेत असलेल्या नातेवाइकांना या कोविड सेंटरच्या गेटजवळ डबा आणून देत आहेत. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारली गेली आहेत. एखाद्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असताना त्या ठिकाणी स्वच्छता राखणे, निर्जंतुकीकरण करणे व औषध उपचार गरजेचे आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णाला चांगल्या दर्जाचे अन्न मिळणेही तितकेच गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात या कोविड सेंटरवर चांगल्या दर्जाचे अन्न मिळत होते. मात्र मागील एक ते दोन महिन्यांपासून येथे चांगल्या दर्जाचे अन्न मिळत नसल्याची तक्रार रुग्णांकडून केली जात आहे.जेवण चांगले मिळत नसल्याची तक्रार काही रुग्णांच्या नातेवाइकांनी केली होती. कंत्राटदाराकडून जेवणाचे कंत्राट काढून घेण्यात आले. त्याच्या जागी आता दुसऱ्याला जेवणाचे कंत्राट देण्यात आले आहे. सध्याच्या अन्नाविषयी कोणाची तक्रार असल्याचे ऐकिवात नाही, असे टी विभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले.