मध्य रेल्वेच्या टिष्ट्वटरवर तक्रारींचा ओघ
By admin | Published: May 22, 2016 02:07 AM2016-05-22T02:07:56+5:302016-05-22T02:07:56+5:30
प्रवाशांकडून टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मध्य रेल्वेच्या टिष्ट्वटरवर तर प्रवाशांकडून समस्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत.
मुंबई : प्रवाशांकडून टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मध्य रेल्वेच्या टिष्ट्वटरवर तर प्रवाशांकडून समस्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात जवळपास २१८ तक्रारी करण्यात आल्या असून यामध्ये ६0 तक्रारी फेरीवाल्यांबाबत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. तर स्वच्छतेविषयी ५८ तक्रारी आणि ट्रेनमधील एसीविषयी ३६ तक्रारी करण्यात आल्या आहेत. उर्वरित तक्रारी या तिकीट परतावा आणि अन्य तक्रारींबाबत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उन्हाळ्यात एसी ट्रेन आणि एसी डबे कमी असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. त्यात ३00 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पश्चिम रेल्वेवर ‘फुकट्या’ प्रवाशांत वाढ
पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ होत आहे. देशभरातील पश्चिम रेल्वे मार्गावर एप्रिल महिन्यात २ लाख ६१ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याशी तुलना करता त्यात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईत १२ कोटी ९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही वाढ जवळपास ५.८९ टक्के एवढी असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. आरक्षित तिकीट अनधिकृतपणे दुसऱ्या प्रवाशाच्या नावावर बदली करण्याची २९९ प्रकरणे उघडकीस आल्याची माहिती देण्यात आली.