Join us

'माझ्याविरोधातील तक्रार सूडबुद्धीनं अन् राजकीय हेतूनं प्रेरित'; अनिल परब यांनी आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 3:52 PM

Anil Parab: नाशिकच्या परिवहन विभागातील निलंबित अधिकाऱ्यानं राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Anil Parab: नाशिकच्या परिवहन विभागातील निलंबित अधिकाऱ्यानं राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन जोरदार राजकारण पेटलं असताना आता खुद्द अनिल परब यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

"विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करुन माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे", असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण दिलं आहे. (Complaints against me motivated by political agenda Anil Parab denied allegations)

"मंत्र्यांवर आरोप करुन राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मलिन करणे, या राजकीय हेतून केलेली ही तक्रार आहे", असं ट्विट अनिल परब यांनी केलं आहे. 

निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक येथे दिलेली तक्रार पूर्णत: निराधार आणि खोटी असल्याचं परब यांनी म्हटलं आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करत असून चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

मनसेने केली राजीनाम्याची मागणीराज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात नाशिकमधील निलंबित परिवहन अधिकाऱ्यानं घोटाळ्याचा आणि वसुलीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. देशपांडे यांनी ट्विट करुन काही सवाल उपस्थित केले आहेत. १०० कोटींची वसुली आता ३०० कोटींवर पोहोचली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांनी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनात तक्रार केली आहे. आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.  

टॅग्स :अनिल परबशिवसेनाआरटीओ ऑफीस