एसटी महामंडळाचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक आंदोलनकर्त्यांनी आपला प्राण गमावला. या कुटुंबातील एका सदस्यास शैक्षणिक पात्रतेनुसार एस. टी. महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे. दरम्यान, ही कार्यवाही १५ जूनपर्यंत पूर्ण करा, असे आदेश एस. टी. महामंडळाने दिले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात मराठा समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर तातडीने राज्य सरकारकडून निर्णय घेतला. युवक आणि युवकांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या सदस्याला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या संदर्भातील एक पत्रक एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकांनी सर्व डेपो व्यवस्थापकांना पाठविले आहे. सर्व विभाग नियंत्रक, विभागीय कर्मचारी वर्ग, अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली जाणार आहे.