मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्ग ३ भुयारी प्रकल्पाचे टनेल बोअरिंग यंत्राच्या साहाय्याने खोदकाम सुरू असून ८०० मीटरचे भुयारी खोदकाम पूर्ण करण्यात आले. एप्रिल अखेरपर्यंत १ किमी टनेलिंग केले जाणार असून, यासाठी मार्गक्रमण सुरू आहे.मेट्रो ३ प्रकल्पाचे खोदकाम सर्वप्रथम माहीम येथील नयानगर येथून करण्यात आले होते. आझाद मैदान, विद्यानगरी (कलिना), मरोळ आणि नयानगर (माहीम) या चार ठिकाणांहून मेट्रोचे भुयारी खोदकाम सुरू असून ८०० मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. खोदकाम करण्याचा वेग हा भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असल्याने दररोज सरासरी १० मीटर खोदकाम केले जाते. असे असतानादेखील मेट्रो प्रकल्पाने ८०० मीटर खोदकाम केले आहे. मुंबईची अंतर्गत स्थिती पाहूनच टनेल मशीनचा वेग कमी-जास्त करण्यात येतो, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली. मेट्रो प्र्रकल्पाचे खोदकाम करण्यासाठी टनेलचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक टनेल मशीनला नद्यांची नावे देण्यात आली आहेत.>मेट्रो ३ प्रकल्पाच्या कामाची स्थितीआरे कार डेपो ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या प्रकल्पातील पहिला टप्पा मार्च २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते कफ परेडपर्यंतच्या प्रकल्पातील दुसरा टप्पा डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. मेट्रो ३ प्रकल्पाचे साधारणपणे १८ टक्के काम झाले आहे. ६० टक्के काम हे सेनेट पाईलिंगचे (खोदकाम करताना आजूबाजूची माती भुयारामध्ये पडू नये) करण्यात आले आहे. ६ लाख ३२ हजार ७१६ घनमीटर अंतर्गत भाग खोदून पूर्ण झाला आहे.असा आहे मेट्रो ३ प्रकल्प६ व्यापारी केंद्र आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारकम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोलिंग (सीबीटीसी) सुविधा असल्यामुळे ट्रेन नियोजित वेळेत येणारबे्रकिंग सुविधेमुळे ३० टक्के ऊर्जेची बचत होणार आहे.आॅटोमॅटिंक भाडे गोळा करण्याची सुविधा आहे.
मेट्रो-३चे ८०० मीटर टनेलिंग पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 4:49 AM