Join us

नवीन विजजोडण्यांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 2:53 PM

Power Of Maharashtra : वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या

मुंबई : एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारी पर्यंत पूर्ण करा; ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले. यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा मिळणे अधिक खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल.

एचव्हीडीएस अंतर्गत वीज जोडणीची कामे झाल्याने शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार असून त्यांना वीज पुरवठा मिळणे अधिक खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल. खानापूर (जिल्हा सांगली) विधानसभा मतदार संघातील ऊर्जा विभागाच्या कामांचा आढावा राऊत यांनी आज घेतला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ओव्हरलोडिंगमुळे रोहित्रे नादुरुस्त होण्याचे समस्या दूर करण्यासाठी ओव्हरलोड झालेल्या रोहित्राशेजारी नवीन रोहित्र उभारण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.

जिल्ह्यातील नवीन वीजजोडणीची प्रकरणे (पेड पेंडिंग) मार्गी लावण्यासाठी स्वखर्चाने तसेच डिपीडिसीच्या निधीतून रोहित्रे उभारणी करू इच्छिणाऱ्यांना रोहित्रे उभारून देण्यात येतात. तथापि, याव्यतिरिक्त मोठया प्रमाणात विजजोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत; ते प्रस्तावित नवीन कृषी वीज धोरणात मार्गी लागतील. त्याचबरोबर महावितरणमधील ३५०० हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, तथापि, मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात  सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबावे लागले असून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

नवीन उपकेंद्र उभारणीचे प्रस्ताव मार्गी लावावेत, 4.5 मेगावॅट सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी जागेची उपलब्धतेचे काम बहुतांश मार्गी लावले आहेत तरी या कामांच्या प्रस्तावाला गती द्यावी, तसेच ३३ केव्ही इएचव्ही सबस्टेशन मधून बे देण्यात यावेत आदी मागण्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.  

टॅग्स :वीजमुंबईमहाराष्ट्रखानापूरसांगली