Join us

पावसाळा पूर्व कामे तातडीने पूर्ण करा, आमदार अतुल भातखळकर यांचे पालिकेला निर्देश

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 7, 2024 15:38 IST

Mumbai News: पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व कामे तातडीने पूर्ण करून  कुठेही पाणी भरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश आमदार भातखळकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. 

- मनोहर कुंभेजकरमुंबई - कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक २३, २४, २७ आणि २८ मधील पावसाळा पूर्व कामे तसेच नालेसफाई कामाची पाहणी भाजप नेते आणि स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी आज केली. पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व कामे तातडीने पूर्ण करून  कुठेही पाणी भरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश आमदार भातखळकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. 

आमदार भातखळकर यांनी कांदिवली पूर्वमधील पोयसर नदी, स्व. प्रमोद नवलकर उद्यान, जनता नगर, हनुमान मंदिर, बिहारी टेकडी, गावदेवी नाला, डीव्हीएम स्कूल जवळील नाला, महिंद्रा यलो गेट नाला, लोखंडवाला ग्रीन मेडोज मागील नाला, वडारपाडा सुलतान तबेला बाजूचा नाला, क्रांती नगर नाला या विविध  ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पालिकेकडून करण्यात येत असलेल्या सफाई कामाचा आढावा घेतला. 

यावेळी पालिकेच्या विविध विभागांचे उपस्थित असलेल्या कार्यकारी अभियंत्यांशी अपूर्ण रस्ते पूर्ण करणे, खड्डे भरणे, गटारांची स्वच्छता, पाणी भरणारी ठिकाणे या पार्श्वभूमीवर करत असणाऱ्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली. यंदा पावसाळ्यात कुठेही पाणी भरू नये, नागरिकांना त्रास होऊ नये, याची दक्षता घेऊन चोख आणि वेगात सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितअधिकाऱ्याना केल्या. यावेळी विभागातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकाअतुल भातखळकर