पावसाळी कामे एप्रिलपर्यंत पूर्ण करा, आयुक्तांची ताकीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:35 AM2018-03-05T07:35:32+5:302018-03-05T07:35:32+5:30
परळ व हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी, या भागात महापालिकेने महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत. ही कामे एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची ताकीदच पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अधिका-यांना दिली.
मुंबई - परळ व हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी, या भागात महापालिकेने महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत. ही कामे एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची ताकीदच पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाºयांना दिली.
गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबईतील १५५ ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले होते. यापैकी महत्त्वाच्या ५५ ठिकाणांना प्राधान्य देऊन, त्या ठिकाणी उपाययोजना महापालिकेमार्फत हाती घेण्यात आल्या आहेत. केईएम रुग्णालय व एल्फिन्स्टन स्टेशनजवळच्या परिसरात सुरू असलेल्या या विविध कामांची पाहणी आयुक्तांनी केली.
मडूळकर मार्ग, फितवाला लेन, सेनापती बापट मार्ग, एस. एल. मटकर मार्ग, टेमकर मार्ग, मडकेबुवा चौक, हिंदमाता जंक्शन परिसरातील कामांची आयुक्तांनी पाहणी केली. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी करून घेण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (शहर) यांना आयुक्तांनी दिले. या कामांमुळे हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होऊ शकेल, असा दावा प्रशासन करीत आहे.
रेल्वे परिसरात विशेष लक्ष
एल्फिन्स्टन पश्चिम आणि फितवाला लेन येथे रेल्वेच्या परिसरात व रेल्वे कारशेडखाली असणाºया ६०० मि.मी. व्यासाच्या पाइप ड्रेनचे रूपांतरण बॉक्स ड्रेनमध्ये करण्यात येणार आहे. याबाबत आवश्यक त्या परवानगी मिळविण्याची प्रक्रिया प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या) यांनी तातडीने करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
एल्फिन्स्टन परिसरातील मडूळकर मार्ग, टेमकर मार्ग येथील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्यासाठी, फितवाला लेन जंक्शनपासून सेनापती बापट मार्ग ते एस. एल. मटकर मार्गांजवळ आरसीसी बॉक्स ड्रेनचे बांधकाम एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. यामध्ये प्रामुख्याने एल्फिन्स्टन स्टेशनजवळील ६०० मि.मी. व्यासाच्या ३ पाइप ड्रेनच्या जागी खुल्या पद्धतीचे कल्व्हर्ट तयार करण्यात येणार आहेत.
तसेच ३ वर्षांपासून रखडलेल्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या परिसरातून जाणाºया ७५० मि.मी. व्यासाच्या पर्जन्यजल वाहिनीवर मॅनहोल बसविण्यात येणार आहे.