Join us

गोरेगावातील नालेसफाईची कामे पावसाळ्याअगोदर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:06 AM

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ५८ व ५७ मधील ओशिवरा नदीनाला, मोतीलालनगर नंबर १ नाला, ...

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ५८ व ५७ मधील ओशिवरा नदीनाला, मोतीलालनगर नंबर १ नाला, ज्ञानेश्वरनगर नाला, सिद्धार्थनगर नाला या विभागांतील मोठ्या नाल्यांच्या कामाची पाहणी राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी नुकतीच केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष स्थळांवर भेट देऊन नाल्यांमधील गाळ उपसणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी पालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गोरेगावतील नालेसफाईची कामे पावसाळ्याअगोदर कामे पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी पी दक्षिण वॉर्डच्या अधिकाऱ्यांना दिले.

तौउते वादळामुळे‌ पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही नाल्यांमध्ये सफाईनंतर पुन्हा माती-मलबा साचल्याचे निदर्शनास आले असता तो गाळ उपसण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले, तसेच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मेअखेरीस येणाऱ्या या वादळामुळे जर मुसळधार पाऊस पडला, तर अशाप्रसंगी पाणी तुंबू नये व पाणी सुरळीतपणे वाहून जावे याकरिता साफसफाईची यंत्रणा अधिक गतीने राबवावी, अशी सूचनाही जनहिताच्या दृष्टीने त्यांनी केली.

तसेच साफसफाईचे कार्य पूर्ण झाल्यानंतर सफाईचा अहवाल देण्याचे आश्वासनही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलीप शिंदे यांना दिले.

यावेळी शाखाप्रमुख भरत बोराडे, चंद्रकांत मोरे, सतीश वागळे, सचिन भोने, रमेश कदम, जितेंद्र इंगळे, महेंद्रा इंगवे व शिवसैनिक उपस्थित होते.