‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 07:57 AM2024-02-04T07:57:16+5:302024-02-04T07:57:44+5:30

मुंबई- गोवा महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.

"Complete the Mumbai-Goa highway immediately" | ‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा’

‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा’

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिल्या. मंत्री गडकरी यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई- गोवा महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही महसूल विभागाने तातडीने पूर्ण करावी. भूसंपादनाचे प्रस्ताव आगामी १५ दिवसांत निकाली काढावेत. महामार्गाच्या कामाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  

सर्व विभागांचा समन्वय आवश्यक
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय जयस्वाल, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता संतोष शेलार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: "Complete the Mumbai-Goa highway immediately"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.