मुंबई : सायन पुलाचे बांधकाम जलदगतीने पूर्ण केले नाही तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी दिला आहे. खा. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सायन रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी त्या बोलत होत्या.
युती सरकारला प्रवाशांची सुरक्षा आणि भवितव्याची पर्वा नाही. पुनर्बांधणीसाठी सायन पूल बंद करून पाच महिने झाले; पण कामात प्रगती झालेली दिसत नाही. मुंबईकरांऐवजी सरकार मूठभर श्रीमंतांसाठीच काम करत आहे, अशी टीका खा. गायकवाड यांनी केली.