विक्रमगडमध्ये खर्च पूर्ण, कामे अपूर्णच
By admin | Published: December 9, 2014 11:00 PM2014-12-09T23:00:51+5:302014-12-09T23:00:51+5:30
तालुक्यात 2क्11-12 या वर्षात सिंचन विहिरी 599 मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 31क् पूर्ण झाल्या आहेत. तर 289 अपूर्ण अवस्थेत आहे.
Next
विक्रमगड : तालुक्यात 2क्11-12 या वर्षात सिंचन विहिरी 599 मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 31क् पूर्ण झाल्या आहेत. तर 289 अपूर्ण अवस्थेत आहे. यावर एकूण साडे पाच कोटींहून अधिक खर्च झाला आहे परंतु आजही 5क् टक्के विहिरी अपूर्ण का असा सवाल आहे तर अजुनही कुशल व अकुशलांची मजूर देणो बाकी आहे. हा गोंधळ कधी संपणार असा सवाल लाभार्थी करीत आहेत.
रोजगार हमीतून बांधकाम विभागाकडून 2क्11-12 मध्ये 5क् रस्ते, 2क्12-13 मध्ये 22 रस्ते अशा एकूण 72 रस्त्यांपैकी फक्त 16 रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 56 रस्ते अपूर्ण आहेत. बांधकाम विभागातून रोजगार हमीच्या माध्यमातून राजीव गांधी भवन 2क्11-12 मध्ये 8 व 2क्12-13 मध्ये 4 एकूण 12 मंजूर आहेत. 12 पैकी 12 हि अपूर्ण आहेत. तालुक्यातील या अपूर्ण कामामुळे 2क्13-14 या वर्षी तालुक्यात रोजगार हमीची कामेच मंजूर झाली नाहीत. आदिवासी दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबाला रोजगार देण्याची जी हमी होती ती न मिळाल्याने या नोंदीत रोजंदाराचा रोजगारच बुडाला आहे. तालुक्यात हा रोजगार हमीचा खेळखंडोबा अधिका:याच्या व ग्रामपंचायतीच्या हलगर्जीमुळे झाला असून त्याला नाहक आदिवासी बळी पडला आहे. काही ग्रामपंचायतीनी तर आपल्या खात्यामधून क्रॉस चेक देणो बंधनकारक असताना मात्र बेअरर चेक देण्यात आले आहे याची चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी केली आहे. जे शासनाचे ध्येय आहे तेच साध्य होताना दिसत नाही. मागील वर्षीपासून कामे अपूर्णच राहताना दिसत आहे. तरी या रोजगार हमीच्या कामाबाबत वरिष्ठ कार्यालयाने लक्ष देवून सर्वसामान्य लाभाथ्र्याना न्याय मिळून द्यावा अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
4सिंचन विहिरी 599 मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 31क् पूर्ण झाल्या आहेत. तर 289 अपूर्ण अवस्थेत आहे. यावर एकूण साडे पाच कोटींहून अधिक खर्च झाला आहे परंतु आजही 5क् टक्के विहिरी अपूर्णच.
4बांधकाम विभागाने हाती घेतलेल्या 72 रस्त्यांपैकी फक्त 16 रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 56 रस्ते अपूर्ण आहेत.