जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा जटिल प्रश्न

By admin | Published: November 12, 2015 12:32 AM2015-11-12T00:32:43+5:302015-11-12T00:32:43+5:30

मुंबादेवी मतदारसंघातील जुन्या इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांसून प्रलंबित आहे. तो मार्गी लावत असताना या वर्षी मुंबादेवीवासीयांच्या शिक्षण

The complex question of redevelopment of old buildings | जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा जटिल प्रश्न

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा जटिल प्रश्न

Next

चेतन ननावरे, मुंबई
मुंबादेवी मतदारसंघातील जुन्या इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांसून प्रलंबित आहे. तो मार्गी लावत असताना या वर्षी मुंबादेवीवासीयांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या कामांसाठी प्राधान्य दिल्याचे स्थानिक आमदार अमिन पटेल यांनी सांगितले.
पटेल म्हणाले की, मुंबादेवी मतदारसंघातील भेंडी बाजारमधील एसबीयूटी आणि इमामवाडामधील बीआयटी चाळी हे दोन क्लस्टर डेव्हलपमेंटमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून या वर्षी हे दोन्ही प्रकल्प सुरू होतील, असा विश्वास आहे. इमामवाडा बीआयटी चाळींमध्ये १ हजार २०० कुटुंबे आहेत. तो प्रकल्प ३३/७ अंतर्गत सुरू होता. तो आता ३३/९ मध्ये रूपांतरित करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पातून मिळणाऱ्या मोकळ्या जागेवर ३० हजार चौरस फुटांचे रुग्णालय आणि १० हजार चौरस फुटांचे ग्रंथालय आणि अभ्यासिका उभी राहणार आहे. परिणामी येत्या दोन ते तीन वर्षांतच मुंबादेवी मतदारसंघाचा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला असेल.
राज्यातील रुग्णालयांच्या उंचीच्या नियमांत २४ मीटरवरून ६० मीटरपर्यंत वाढ करण्याची मागणी सातत्याने लावून धरली. आघाडी सरकारने याबाबतचा निर्णयही घेतला. आचारसंहितेमुळे त्याचे परिपत्रक राहिले. मात्र संबंधित विभागाकडे अद्याप पाठपुरावा सुरू असून त्याचा फायदा राज्यातील सर्वच रुग्णालयांना होणार असून रुग्णांना अधिक खाटा उपलब्ध होणार आहेत.
शिवाय जुन्या इमारतींच्या डागडुजीसाठी म्हाडाला १०० कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये म्हाडा प्रशासन टप्प्याटप्प्याने डागडुजी करते. मात्र त्यामुळे इमारतीची योग्यरीत्या डागडुजी होत नाही. परिणामी किमान ५०० कोटींचा निधी देऊन एकत्र डागडुजी करण्याची गरज पटेल यांनी व्यक्त केली. मुंबईतील १६ हजार जुन्या इमारतींपैकी एकट्या मुंबादेवीत निम्म्या इमारती असल्याचा त्यांचा दावा आहे.
पालिका प्रशासनाच्या बंद पडलेल्या शाळांना पुनर्जीवित करण्यासाठी या वर्षी प्रयत्न करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले की, विभागातील लोकांची गरज ओळखून हिंदी, मराठी आणि उर्दू अशा सर्वच शाळांमध्ये इतर माध्यमांचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू केले असून पुढील वर्षीपासून पालिकेच्या शाळांना पुन्हा सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: The complex question of redevelopment of old buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.