दृष्टिपटलातील क्लिष्ट शस्त्रक्रिया आता होणार सहज शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:57 AM2020-03-02T05:57:51+5:302020-03-02T05:58:01+5:30

दृष्टिपटल आणि नेत्रविकारातील क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया आता नायर रुग्णालयात शक्य होणार आहेत.

Complex surgery for the retina is now possible | दृष्टिपटलातील क्लिष्ट शस्त्रक्रिया आता होणार सहज शक्य

दृष्टिपटलातील क्लिष्ट शस्त्रक्रिया आता होणार सहज शक्य

Next

मुंबई : दृष्टिपटल आणि नेत्रविकारातील क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया आता नायर रुग्णालयात शक्य होणार आहेत. मोतीबिंदू, ग्लोकोमा, लेझर अशा एकाहून अधिक उपचार या एकाच मशीनने शक्य होणार आहेत. डोळ्याच्या विविध विकारांवर उपचार करणारी ही देशातील पहिलीच मशीन नायर रुग्णालयात आली आहे. त्यामुळे आता गरजू रुग्णांना मशीनच्या साहाय्याने अत्याधुनिक उपचार सहज उपलब्ध होणार आहेत.
नेत्रविकारातील अद्यापपर्यंत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ग्लोकोमा शस्त्रक्रिया आणि इतरही सर्जरी करणाºया मशीन्स आहेत. मात्र, या सर्व सर्जरी एकाच यंत्रात होत नसल्याने एकाहून अधिक मशीनचा वापर करावा लागत होता. या सर्व शस्त्रक्रियांसहित नेत्रविकारातील वेट्रो रेटिना शस्त्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. या मशीनमध्ये वेट्रो रेटिना व लेझर सुविधाही समाविष्ट करण्यात आली आहे. सव्वा कोटी रुपये किमतीच्या या मशीनमुळे नायर रुग्णालयातील नेत्रविभाग अधिक बळकट झाला आहे.
नायर रुग्णालयात दररोज ५0 ते ६0 रुग्ण दृष्टिपटलाच्या समस्या येतात. यातील किमान दहा जणांना वेट्रो रेटिना सर्जरीची आवश्यकता लागते. या मशीनमुळे हे उपचार नेत्र रुग्णांना सहज मिळणार असल्याचे नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. खासगी रुग्णालयात ही सुविधा नसून पालिका रुग्णालयात रुग्णांना नेत्रविकारातील कोणते उपचार सहज उपलब्ध होतील याबाबतची माहिती नायर रुग्णालय नेत्रविभाग प्रमुख प्रा. डॉ. सरोज सहदेव यांनी दिली. कित्येकदा दृष्टिपटलावर पडदा येतो. अशा वेळी शस्त्रक्रिया करून दृष्टिपटल बाहेरून बसवू शकत नाही. अशा स्थितीत डोळ्यातील व्हिट्रस काढून रेटीनावर उपचार कले जातात. कमजोर भागावर लेजरही करावे लागते. त्यामुळेच दृष्टिपटल एकाच जागी स्थिर बसू शकते. ही क्लिष्ट शस्त्रक्रिया यामुळे सहज होईल.

Web Title: Complex surgery for the retina is now possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.