विमानतळावरील तपासणीची क्लिष्ट प्रक्रिया होणार सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:46 AM2019-01-18T05:46:54+5:302019-01-18T05:48:28+5:30

पूर्ण शरीराचे स्कॅनिंग : नव्या यंत्रणेला भारतात परवानगी मिळण्याची शक्यता

The complicated processing of the airport investigation is easy | विमानतळावरील तपासणीची क्लिष्ट प्रक्रिया होणार सुलभ

विमानतळावरील तपासणीची क्लिष्ट प्रक्रिया होणार सुलभ

Next

- खलील गिरकर


मुंबई : कोणतेही घातपाती कृत्य होऊ नये, यासाठी विमानतळावर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे विमानतळामध्ये प्रवेश केल्यापासून विमानात बसेपर्यंत प्रवाशांना अनेक सुरक्षा तपासणींतून जावे लागते. सध्या सीआयएसएफद्वारे होणाऱ्या या प्रक्रियेचे लवकरच आधुनिकीकरण केले जात आहे. पूर्ण शरीराचे स्कॅनिंग करणाºया या यंत्रणेला या वर्षी भारतात परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विमानतळावरील तपासणीची क्लिष्ट प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे.


देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)च्या जवानांवर कामाचा ताण वाढलेला आहे. विद्यमान पद्धतीत तपासणीसाठी जास्त वेळ लागतो. त्या तुलनेत नवीन पद्धतीत अत्यंत कमी वेळ लागेल. ही यंत्रणा सुरू झाल्यावर विमानतळावर सुरक्षा तपासणी करणाºया सीआयएसएफ जवानांवरील कामाचा ताण कमी होऊ शकेल. मिलीमीटर वेव्हवर आधारित या यंत्रणेमधून प्रवासी पार झाल्यानंतर ३ डी दर्जाची प्रतिमा मिळेल त्याद्वारे प्रवाशांच्या कपड्यांमध्ये काही वेगळी वस्तू लपवलेली असल्यास त्याची त्वरित माहिती मिळेल. अवघ्या ५ सेकंदांत ही प्रक्रिया पार पडेल, असा दावा करण्यात आला आहे. या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रवाशांच्या शरीरावरून जातील व संशयास्पद वस्तू आढळल्यास त्या प्रवाशाची अधिक तपासणी होईल. यात विशेष सॉफ्टवेअर बसविल्याने प्रवाशाची फक्त आऊटलाइन येईल, असे सूत्रांनी सांगितले.


ब्युरो आॅफ स्व्हििल एव्हिएशन सेफ्टी (बीसीएएस) कडून या प्रक्रियेसाठी परवानगी मागण्यात आली असून परवानगी मिळताच याचा वापर करण्यात येईल. गरोदर महिला, पेसमेकर बसविलेले हृदयरोगी यांच्यासाठी यामध्ये काळजी घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.


दोन पद्धतींत राबवणार प्रक्रिया
नव्याने राबविण्यात येणाºया प्रक्रियेत प्रवाशांनी कपड्यांमध्ये काही लपविलेले असल्यास त्वरित कळेल. या स्कॅनिंगमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एकामध्ये शरीरावर काही वस्तू असल्यास ते दर्शविणारा एक पर्याय उपलब्ध असून, दुसºया पद्धतीत शरीराच्या आत काही गिळले असल्यास त्याची माहिती मिळेल. अमेरिका, चीन, रशिया, ब्राझिल अशा अनेक विमानतळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून ही यंत्रणा वापरली जात आहे. मात्र भारतात अद्याप ही प्रक्रिया सुरू झालेली नाही.

Web Title: The complicated processing of the airport investigation is easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.