अजरामर गीतांना सूरसाज चढवणारा देव माणूस हरपला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 07:30 AM2018-10-30T07:30:08+5:302018-10-30T08:14:48+5:30
या जन्मावर या जगण्यावर, जीवनात ही घडी अशीच राहू दे, भातुकलीच्या खेळामधली, दिवस तुझे हे फुलायचे अशा अजरामर गीतांनी मराठी श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले ज्येष्ठ संगीतकार-गीतकार यशवंत देव यांचे निधन झाले.
मुंबई - या जन्मावर या जगण्यावर, जीवनात ही घडी अशीच राहू दे, भातुकलीच्या खेळामधली, दिवस तुझे हे फुलायचे अशा अजरामर गीतांनी मराठी श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले ज्येष्ठ संगीतकार-गीतकार यशवंत देव यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या ज्या गाण्यांनी मराठी मनांवर अधिराज्य गाजवलं. यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला. त्यांच्यe घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. देव यांचे वडील हेच त्यांचे पहिले गुरू होते. त्यांच्या वडिलांकडून देव यांना तालाचे बाळकडू मिळाले. जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी
- या जन्मावर या जगण्यावर
- जीवनात ही घडी अशीच राहु दे
- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
- दिवस तुझे हे फुलायचे
- येशिल येशिल येशिल राणी
- अशी पाखरे येती आणिक
- असेन मी नसेन मी
- कुठे शोधिसी रामेश्वर
- ठुमकत आल्या किती गौळणी
- काही बोलायाचे आहे
- डोळ्यात सांजवेळी आणू
- गणपती तू गुणपती तू
कवी यशवंत देव यांनी लिहिलेली काही गाणी
- जीवनात ही घडी अशीच राहू दे
- कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे
- माणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे
- कामापुरता मामा
- रात्रिच्या धुंद समयाला
- स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी
- अरे देवा तुझी मुले अशी
- दिवाळी येणार अंगण सजणार
- मने दुभंगली म्हणून जोडता येत नाही
- रात्रिच्या धुंद समयाला