Join us

मनसेच्या ‘कल्याण बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By admin | Published: November 25, 2014 1:56 AM

मनसेचे चिकणघर विभागाचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध म्हणून सोमवारी पुकारलेल्या कल्याण बंदच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

कल्याण : मनसेचे चिकणघर विभागाचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध म्हणून सोमवारी पुकारलेल्या कल्याण बंदच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिेमतील काही भाग वगळता इतरत्र ठिकाणी बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. 24 तासाहुून अधिक काळ उलटूनही याप्रकरणातील आरोपींना अटक न केल्याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. लवकरच आरोपींना अटक करण्याचे आश्वासन यावेळी वरीष्ठ पोलीस निरिक्षक दिनेश कटके यांनी आंदोलनकत्र्याना दिले. 
शुक्रवारी मध्यरात्री शाखाध्यक्ष भोईर यांच्यासह स्वप्निल वर्पे आणि रतन केणो या तिघांवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याण मधील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भोईर यांच्या तक्रारीवरून विजय तेली, सचिन यादवडे, जय डोंगरे, निखिल देसले यांच्यासह अन्य 1क् ते 12 जणांविरोधात जिवे मारण्याचा प्रय} आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याचा इशारा मनसेने दिला होता. याउपरही आरोपींना अटक न झाल्याने सोमवारी कल्याण बंदचे आवाहन मनसेने केले होते. जीवनावश्यक सेवांबरोबरच शाळा, बसेस आणि रिक्षा यांना मात्र या आंदोलनातून वगळले होते. त्यामुळे या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. 
चिकणघर, रामदासवाडी, रामबाग या ठिकाणी मात्र दुकाने बंद ठेवली होती.(प्रतिनिधी)
 
नांदगावकरांकडून विचारपूस
कल्याण : प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्यांची सोमवारी रात्री 8च्या सुमारास मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली. जखमी शाखाध्यक्ष भोईर, वर्पे आणि केणो यांच्यावर कल्याण मधील फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या 
वेळी त्यांच्यासोबत माजी आमदार 
प्रकाश भोईर, जिल्हा सरचिटणीस इरफान शेख, शहरअध्यक्ष रवींद्र भोसले, वैशाली विखनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.