सिलिंडर गाेदामाला लागलेल्या आगीची सर्वंकष चाैकशी - महापाैर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:37 AM2021-02-11T02:37:34+5:302021-02-11T02:38:47+5:30

दाेषींवर कारवाई करणार; निवासी भागात सिलिंडरचा साठा करणे चुकीचे

Comprehensive check of fire in cylinder godown says mayor kishori pednekar | सिलिंडर गाेदामाला लागलेल्या आगीची सर्वंकष चाैकशी - महापाैर

सिलिंडर गाेदामाला लागलेल्या आगीची सर्वंकष चाैकशी - महापाैर

Next

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील यारी रोडवरील सिलिंडर गोदामाला लागलेल्या आगीची दखल महापाैर किशाेरी पेडणेकर यांनी घेतली. एका व्यक्तीच्या फायद्यासाठी अनेकांचा जीव धोक्यात घालणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची सर्वंकष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवासी भागात सिलिंडरचा साठा करणे चुकीचे आहे. तक्रारीनुसार अग्निशमन दल, मुंबई पालिकेचा संबंधित विभाग यांना सोबत घेऊन संबंधितांविरूद्ध कारवाई करणार असल्याचे महापाैरांनी स्पष्ट केले.

अग्निशमन दलाच्या १६ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.. या घटनेबाबत सर्व यंत्रणांची आगामी दोन दिवसांत बैठक घेऊन कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.

दरम्यान, मानखुर्द - घाटकोपर लिंक रोडवरील, मानखुर्द मंडाळा येथील कुर्ला भंगार गोदामाला आग लागल्याची दुर्घटना नुकतीच घडली हाेती. या ठिकाणी अवैधपणे ऑइलचा साठा करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी दिली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यापूर्वी पालिका व पोलिसांच्या मदतीने कारवाईही झाली हाेती. त्यानंतरही अगीची दुर्घटना घडली.

भूमाफिया टोळीचाही बंदोबस्त 
कारवाईनंतर पुन्हा भूमाफिया तिथे सक्रिय होऊन अवैध अड्डे स्थापन करीत असतात. त्यातूनच  मानखुर्द - घाटकोपर लिंक रोडवरील, मानखुर्द मंडाळा येथील कुर्ला भंगार गोदामात आगीची दुर्घटना घडली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन भूमाफिया टोळीचा बंदोबस्त करण्यात येईल, असे महापौर म्हणाल्या.
 

Web Title: Comprehensive check of fire in cylinder godown says mayor kishori pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.