तर तपास पथक कॉम्रेड पानसरेंवर उमाताईंनीच गोळ्या झाडल्या असे म्हणेल, सनातनचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 04:30 PM2018-12-01T16:30:11+5:302018-12-01T17:05:57+5:30

उमा पानसरे यांनीच कॉम्रेड पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप तपास पथकाने केला, तर नवल वाटायला नको, असे वक्तव्य हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे.

comrade govind pansare murder case | तर तपास पथक कॉम्रेड पानसरेंवर उमाताईंनीच गोळ्या झाडल्या असे म्हणेल, सनातनचा आरोप

तर तपास पथक कॉम्रेड पानसरेंवर उमाताईंनीच गोळ्या झाडल्या असे म्हणेल, सनातनचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 2015 मध्ये समीर गायकवाड याने गोळ्या झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता.उमा पानसरे यांनीच कॉम्रेड पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप तपास पथकाने केला, तर नवल वाटायला नको - वीरेंद्र इचलकरंजीकरमुंबई मराठी पत्रकार संघात नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत इचलकरंजीकर यांनी हे वक्तव्य केलेले आहे.

मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 2015 मध्ये समीर गायकवाड याने गोळ्या झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता. मात्र त्यानंतर गेल्या चार वर्षांत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तीन वेगवेगळी कथानके मांडली आहेत. त्यामुळे भविष्यात उमा पानसरे यांनीच कॉम्रेड पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप तपास पथकाने केला, तर नवल वाटायला नको, असे वक्तव्य हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत इचलकरंजीकर यांनी हे वक्तव्य केलेले आहे. तपास यंत्रणांनी हिंदू धर्मविरोधी यांच्या दबावातून 2015 मध्ये समीर गायकवाड यांनी पानसरे नवर गोळी झाल्याचा आरोप करत अटकसत्राला सुरुवात केली. त्यावेळी समीर गायकवाड हा सनातनचा साधक आहे आणि तो निर्दोष असल्याचा दावा सनातनने केला होता. आज समीर गायकवाड जामिनावर मुक्त असून पोलीसही त्याच्याविरोधात जामीन रद्द करण्याचा खटला चालवत नाहीत. त्याआधी सीबीआयने सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी गोळ्या झाडल्याचा आरोप केला होता. आता सीबीआय सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांनी गोळ्या झाल्याचा आरोप करत आहे. सातत्याने मारेकऱ्यांची नावे बदलली जात आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि सीबीआयने दाखल केला अर्ज यांमध्येही गोळ्या लागण्याच्या अवयवांत तफावत दिसत आहे. तसेच खुनांचे कालावधीही बदलत आहेत. त्यामुळे सीबीआय तपासाच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कदाचित अशाप्रकारे कथानकात बदल झाल्यास भविष्यात कॉम्रेड पानसरेंबरोबर फिरायला गेलेल्या उमा पानसरे यांवर मारेकर्‍याचा ठपका ठेवला जाऊ शकतो, अशी शक्यता इचलकरंजीकर यांनी व्यक्त केली आहे.

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनला गोवण्यासाठी तपास यंत्रणांना हाताशी घेऊन ही कथानके मांडले जात असल्याचा आरोप सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी केला आहे. गौरी लंकेश प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून अमोल काळेचे नाव घेतले जात आहे. तो गेली दहा वर्षे समितीच्या कुठलाही संपर्कात नव्हता किंवा समितीचा कुठलाही पदाधिकारी नव्हता. तसेच डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे हेही समितीच्या कुठल्याही कार्यात सहभागी नसताना त्यांना सीबीआयने आरोपपत्र समितीचे उपाध्यक्ष म्हटलेले आहे. मुळात समितीच्या कार्यातच अशी कुठलीही पदे अस्तित्वातच नाहीत. तरीही संबंधित आरोपी समितीचे कार्यकर्ते असल्याचे भासवले जात आहे. हिंदुत्वविरोधी कायद्यांना विरोध होऊ नये म्हणून सनातनच्या बदनामीची खोटी मोहीम सुरू असल्याचा आरोप चेतन राजहंस यांनी केला आहे.

Web Title: comrade govind pansare murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.