Join us

सवलतधारकांचीही एसटीकडे पाठ; संपामुळे घट, १,३०० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 5:49 AM

एसटी महामंडळांकडून ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येतात.

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:एसटी महामंडळांकडून ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येतात. एसटी बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजनेत ४५ ते १०० टक्के भाडे सवलत दिली जाते. मात्र सवलतधारकांमध्ये यंदा घट झाली आहे. लाभार्थी संख्या ७. ७३ कोटी झाली, तर उत्पन्न ३८९ कोटी झाले आहे. वाढलेल्या भाडेदरानुसार हे उत्पन्न १७०० कोटी असायला हवे होते, मात्र १३११ कोटींचा फटका बसला आहे, असे एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.  

सध्या एसटीची प्रवासी सेवा पूर्णक्षमतेने सुरू असूनही प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याने दिसून येत आहे. कोरोनामुळे कंबरडे मोडलेला एसटी महामंडळाचा गाडा त्यामध्ये साडेपाच महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एसटीचा प्रवासीवर्ग दुरावला गेला. इतकेच नव्हे, तर भाडे सवलत असणाऱ्या प्रवाशांनीहीदेखील पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 

ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील विविध घटकांना एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यात सवलत देण्यात येते. यामध्ये  ज्येष्ठ नागरिक,  विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, डायलिसिस  रुग्ण, अपंग, सर्वसाधारण प्रवासी, विविध सेवा पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा (आदिवासी सेवक पुरस्कार्थी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार्थी, शिव छत्रपती पुरस्कार्थी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सन्मान शहीद योजना यासह अन्य) लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे.

वर्ष  लाभार्थी  सवलतीची संख्या (कोटी) रक्कम (कोटी)

२०१७-१८    ३८    १३८३  २०१८-१९    ३९    १६२०१९-२०     ३७    १७०६२०२०-२१    ८.६१     ३७७२०२१-२२    ७. ७३     ३८९ 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एसटी