पावसामुळे मुंबईत पक्ष्यांचे व सरपटणाऱ्या प्राण्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:01+5:302021-07-23T04:06:01+5:30

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका सरपटणारे प्राणी व पक्ष्यांनादेखील ...

The condition of birds and reptiles in Mumbai due to rains | पावसामुळे मुंबईत पक्ष्यांचे व सरपटणाऱ्या प्राण्यांचे हाल

पावसामुळे मुंबईत पक्ष्यांचे व सरपटणाऱ्या प्राण्यांचे हाल

Next

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका सरपटणारे प्राणी व पक्ष्यांनादेखील बसला आहे. मुंबईतील विविध परिसरातून वन्यजीव मित्रांनी अनेक सरपटणारे प्राणी व पक्ष्यांना जीवदान दिले आहे.

अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लँट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी(पॉज-मुंबई)च्या स्वयंसेवकानी बोरिवली येथून २ अजगर, २ घोणस, दहिसर येथून १ मांजऱ्या सर्प, ३ नाग, राममंदिर येथून १ धामण, वांद्रे येथून १ झिलान, दहिसर येथून १ तस्कर, बोरिवली व भांडुप येथून २ घोरपड आणि वांद्रे व भांडुप येथून ३ घार पक्षी असे १६ हून अधिक सरपटणारे प्राणी व पक्ष्यांची सुटका करण्यात आली.

या सर्व वन्यजीवांना तपासणीकरिता पशुवैद्य डॉ. राहुल मेश्राम आणि डॉ. मनीष पिंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले. संस्थेचे स्वयंसेवक व प्राणिमित्र निशा कुंजू, सुष्मिता दिघे, आकाश पंड्या, अभिजित सावंत, सिद्धेश तावरे, संदीप म्हापरळकर, हितेश यादव, सुनील गुप्ता, प्रफुल्ल जोंधळे, अक्षय बच्चे व प्रथमेश उघडे या सर्वांनी या पक्ष्यांना व प्राण्यांना जीवदान दिले. वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन यांच्या देखरेखीखाली या सर्व प्राण्यांना व पक्ष्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सुखरूपपणे सोडण्यात आले.

Web Title: The condition of birds and reptiles in Mumbai due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.