भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:09 AM2021-09-16T04:09:03+5:302021-09-16T04:09:03+5:30

मुंबई : आगामी काळात सरकारच्या सर्व विभागांमध्ये पदभरती करताना उमेदवारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने भरती ...

Conduct the recruitment process in a transparent manner | भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवा

भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवा

googlenewsNext

मुंबई : आगामी काळात सरकारच्या सर्व विभागांमध्ये पदभरती करताना उमेदवारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी व परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दिले.

मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सरकारी कार्यालयांतील पदभरतीच्या अनुषंगाने सुधारित परीक्षा पद्धतीसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव प्रशांत साजणीकर, महाआयटीचे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव सुधीर निकाळे, तसेच परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उमेदवाराची चेहरा ओळख सांगणारे तंत्रज्ञान, तसेच जॅमर लावणे यासारख्या उपायांचा समावेश परीक्षा पद्धतीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी पेपर फुटू नये व डमी उमेदवार परीक्षेस बसू नये यादृष्टीने काळजी घ्यावी. परीक्षेत काही गडबड झाल्यास संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशाराही राज्यमंत्र्यांनी दिला.

------------------------

स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांसाठी विशेष मोहीम

स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याबाबत परिपत्रकानुसार विशेष मोहीम राबवावी, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रलंबित निवृत्तीवेतनाबाबत राजस्थान सरकारच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे नामनिर्देशित पाल्य यांना सरकारी सेवेत घेण्याबाबत ४ मार्च १९९१ च्या परिपत्रकानुसार यापूर्वी ज्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी ही भरतीप्रक्रिया राबविली त्यानुसार नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व पुढील पदोन्नती देण्यात यावी, यासह स्वातंत्र्यसैनिकांच्या विविध मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, उपसचिव सं.के. गुप्ते, महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Conduct the recruitment process in a transparent manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.