Join us  

विधान परिषद सभापतिपद निवडणूक त्वरित घ्या; महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 9:30 AM

विधान परिषदेचे सभापतिपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे.

मुंबई : विधान परिषदेचे सभापतिपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे. याविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवडणूक घेण्याबाबतची मागणी केली आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील आदी नेते या भेटीवेळी उपस्थित होते. या भेटीनंतर दानवे म्हणाले, विधान परिषदेचे सभापतिपद मागच्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. त्याची निवड व्हावी, अशी मागणी वारंवार सभागृहात करण्यात आली आहे. हे पद रिक्त ठेवणे घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. ही निवडणूक घेणे राज्यपालांचा अधिकार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने यासंदर्भात राज्यपालांना कळवायला हवे. पण अद्याप त्यांना कळविण्यात आलेले नाही. म्हणूनच ही भेट घेतली. राज्यपालांनी आमच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईमहाविकास आघाडी