मुंबई : महापालिकेच्या कार्यानुभव विभागातर्फे आनलाइन राखी बनविण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी कलात्मक आकर्षक राख्या बनवल्या. या वेळी शिक्षिका रूपाली बारी, शिक्षणाधिकारी राजू ताडवी, भार्गव मेहता यांचा सहभाग होता.
कुष्ठरुग्णांना मदत
मुंबई : मुंबई विभागीय राष्ट्रीय विमुक्त भटके मागासवर्गीय महासंघ आणि राष्ट्रीय बंजारा क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळ्यातील कुष्ठरोग रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप कऱण्यात आले. याप्रसंगी, रुग्णांनी कृतज्ञता व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
शिल्पकृतींचे प्रशिक्षण
मुंबई : जोगेश्वरी येथील गावडे बंधू यांच्या मूर्ती कार्यशाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लहानग्यांसाठी मूर्ती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या एक दिवसीय प्रशिक्षणात शिवटेकडी, शामनगर, मेघवाडी येथील लहानग्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या सहभागी लहानग्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.