Join us

जप्त केलेल्या कार मूळ मालकांच्या हवाली

By admin | Published: May 07, 2017 4:44 AM

पंचतारांकित हॉटेलकरिता ५० हजार भाड्याने कार लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्या, ‘त्या’ ७१ कार ठाणे शहर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पंचतारांकित हॉटेलकरिता ५० हजार भाड्याने कार लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्या, ‘त्या’ ७१ कार ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी मूळ मालकांना परत केल्या. या आलिशान ७१ कार्सची किंमत जवळपास पावणेसात कोटी आहे.सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील वाहनचालक व मालकांना ‘ग्रँड हयात’ यासारख्या नामांकित हॉटेलकरिता मोठ्या रकमेच्या भाड्याने कार लावण्याचे आमिष दाखवून, खोटे करारनामे करण्यात आले होते, तसेच त्यांच्याकडून त्यांच्या कार व अनामत रक्कम म्हणून १५ हजार घेऊन कार कोठेही भाड्याने न लावता, त्या मुंब्रा, दिवा, देसाईगाव, भांडुप आदी ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या. त्या कार परस्पर विक्रीच्या तयारीत असणाऱ्या मुख्य आरोपी अनुराग रवींद्रनाथ तिवारी (४०), रा. मुंब्रा, रोहित विष्णू घरत (२९) रा. मुंब्रा आणि राजेंद्र राममुरत यादव (३५) रा. दिवा या तिघांना ठाणे सोनसाखळी चोरीविरोधी पथकाने १३ एप्रिल रोजी अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडून ७१ आलिशान कार जप्त केल्या होत्या. कारमालकांनी त्या कार व्यवसायाकरिता बँक कर्जाद्वारे खरेदी केलेल्या होत्या. त्या कार परत मिळण्याकरिता न्यायालयीन, तसेच पोलीस कार्यवाहीस विलंब लागू नये, म्हणून कारच्या मूळ मालकांऐवजी पोलिसांनीच न्यायालयास अर्जाद्वारे तत्काळ वाहने परत देण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शनिवारी कार मूळ मालकांना परत करण्याचा ठाणे पोलिसांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. खात्री केल्याशिवाय कोणतेही पाऊल नाही‘जुनी कार विकू न नवीन कार घेतली. ती कार ५० हजार महिना भाड्याने ‘ग्रँड हयात’ हॉटेलला लावण्याचे आमिष मिळाल्याने कार भाड्याने दिली होती. जप्त केलेली कार मिळाल्याने खूप आनंद झाला. यापुढे खात्री केल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलणार नाही, असे कारमालक हर्षिदा दळवी यांनी सांगितले.