Join us

आलिशान वाहनांवर जप्ती; पाणीपुरवठाही तोडला, मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेचा कारवाई धडका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 3:45 AM

अंधेरी येथील सोलिटेयर कॉपोर्रेट पार्क व वरटेक्स बिल्डिंगच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. मलवाहिनीही थोपवण्यात आली. कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी थकीत रकमेच्या ५० टक्के रक्कम म्हणजे ९.६० कोटी व ३१ लाख रुपये भरले.

 मुंबई: मालमत्ता कर थकबाकीपोटी आलिशान वाहनांची जप्ती करण्याचा पर्याय वापरण्यात आला. काही ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली. २०२०-२१ मध्ये ५ हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत ३ हजार ६५० कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. (Confiscation of luxury vehicles; Water supply also cut off, municipal action for recovery of property tax hit)

अंधेरी येथील सोलिटेयर कॉपोर्रेट पार्क व वरटेक्स बिल्डिंगच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. मलवाहिनीही थोपवण्यात आली. कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी थकीत रकमेच्या ५० टक्के रक्कम म्हणजे ९.६० कोटी व ३१ लाख रुपये भरले. आय मॅक्स थिएटरची मालमत्ता कराची थकबाकी ही ७५ लाख झाल्याने जलजोडणी खंडित केली. चंदुलाल पी. लोहना यांची मालमत्ता कराची ३८ लाख ८० हजार ७०५ थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची बी.एम.डब्ल्यू. कार जप्त करण्यात आली. संबंधितांंद्वारे १९ लाख इतकी रक्कम जमा करून गाडी सोडवून नेण्यात आली. युनिटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांची मालमत्ता कराची १ कोटी १० लाख २२ हजार २४० थकबाकी असल्यामुळे त्यांची ब्रिझा कार जप्त करण्यात आली. ऑफिस सिल केले. चालू बांधकाम बंद केले. 

रिलायन्सलाही दणका - आतापर्यंतच्या कारवाईत भारत डायमंड बोर्स यांच्या प्रतिदानाच्या विवादाप्रकरणी तोडगा काढून २५.८६ कोटी मालमता कर वसुली करण्यात आली आहे. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विविध मालमतांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तक्रारी प्रकरणातून पक्षकाराकडून ३९ कोटी रुपयांच्या मालमता कराच्या रकमेची वसुली पालिकेकडून करण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईकर