बंबार्डियरवरून ‘मरे’त मतभेद

By admin | Published: August 19, 2015 11:33 PM2015-08-19T23:33:50+5:302015-08-19T23:33:50+5:30

मध्य रेल्वे मार्गावर नव्या बंबार्डियर लोकल महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांच्याकडून नाकारण्यात येत आहेत. मात्र मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या

Conflicts in 'Murray' from Bambdier | बंबार्डियरवरून ‘मरे’त मतभेद

बंबार्डियरवरून ‘मरे’त मतभेद

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर नव्या बंबार्डियर लोकल महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांच्याकडून नाकारण्यात येत आहेत. मात्र मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या या भूमिकेला मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनीच विरोध केला असून मध्य रेल्वे प्रवाशांच्या वाट्याला जुन्या लोकल का, असा सवालच अधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयुटीपी-२ अंतर्गत ७२ नव्या बंबार्डियर लोकल आणल्या जाणार असून यातील तीन लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ऊर्वरीत गाड्या २0१६ मध्ये दाखल होतील. याआधी ४२ लोकल मध्य रेल्वे मार्गावर तर ३0 लोकल पश्चिम रेल्वेच्या वाट्याला देण्याची योजना रेल्वेकडून आखण्यात आली. मात्र काही महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक पद रिक्त असतानाच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्याऐवजी पश्चिम रेल्वेवरील सिमेन्स लोकल मध्य रेल्वेला देण्याची मागणी त्यांनी रेल्वे बॉर्डाकडे केली. मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी किती वर्ष जुन्या गाड्या वाट्याला सहन करायचा ही विचार करणारी गोष्ट आहे. त्यामुळे बंबार्डियर पश्चिम रेल्वेवरच चालवण्याचा सूद यांचा आगळावेगळा हट्ट का असा प्रश्न मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनाच पडला आहे.त्याला प्रवासी संघटनांचाही विरोध आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Conflicts in 'Murray' from Bambdier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.