Join us

गोंधळात गोंधळ; समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदारयादीत सापडलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 11:21 AM

निवडणूक यंत्रणेचे अधिकारी वर्षानुवर्षे हेच काम करतात. मग, त्यांना अनुभव नाही, किंवा माहिती नाही हे कसं शक्य आहे.

मुंबई - माजी खासदार समीर भुजबळ यांच्या आईचे नाव भायखळा मतदारसंघातील यादीत आले आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी त्यांच्यासमवेत भुजबळ कुटुंबीयही उपस्थित होते. ईव्हीएम मशिन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये काहीतरी राजकीय डावपेच असल्याचे सांगत भुजबळ यांनी काहीतरी गडबड असल्याचा मला संशय वाटतो, असे म्हटले होते. तर, हिराबाई भुजबळ यांचे नाव मतदान यादीत नसल्याने निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  

निवडणूक यंत्रणेचे अधिकारी वर्षानुवर्षे हेच काम करतात. मग, त्यांना अनुभव नाही, किंवा माहिती नाही हे कसं शक्य आहे. या अधिकाऱ्यांवर वरुनच काहीतरी दबाव असू शकतो, असे म्हणत समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याबद्दल छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. भुजबळांनी मतदान केल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदार यादीतून गायब झालं आहे. हे सगळं ठरवून केलं जातंय, असे भुजबळ म्हणाले. हिराबाई मगन भुजबळ हे समीर भुजबळ यांच्या आईचं नाव असून, मतदार यादीतून समीर भुजबळांच्या आईचे नाव गायब असल्याचे भुजबळ यांनी म्हटले होते. मात्र, फेब्रुवारी 2019 मध्ये भुजबळ कुटुंबीयांनी हिराबाई भुजबळ यांच नाव भायखळा मतदारसंघात वर्ग करण्यासाठी अर्ज केला होता. पण, मतदानावेळी ते नाव तिथे आहे का, हे पाहण्यात आले नाही. त्यानंतर, आता हे समीर यांच्या आईचे नाव भायखळा मतदारसंघात नोंद करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हिराबाई यांनी 2009 मध्येही नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मतदान केले आहे.  

टॅग्स :समीर भुजबळमतदाननिवडणूकनाशिकमुंबई