जपानी भाषेच्या पेपरमुळे गोंधळ
By admin | Published: March 11, 2016 04:14 AM2016-03-11T04:14:08+5:302016-03-11T04:14:08+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या सुरू असलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेतील सावळा गोंधळ थांबण्याची चिन्हे नाहीत. बारावी बोर्डाच्या बुधवारी झालेल्या जपानी भाषेच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या सुरू असलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेतील सावळा गोंधळ थांबण्याची चिन्हे नाहीत. बारावी बोर्डाच्या बुधवारी झालेल्या जपानी भाषेच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना हस्तलिखित प्रश्नपत्रिकेच्या छायाप्रती वाटल्याने विद्यार्थ्यांची पुरती तारांबळ उडाली होती.
झेरॉक्समधील अनेक शब्द कळलेच नसल्याने, परीक्षेत उत्तीर्ण होण्याची आशाच सोडल्याची प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त
केली आहे. या प्रकरणी बोर्डाने प्रश्नपत्रिकेत कोणताही गोंधळ झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई विभागीय मंडळातून एकूण १७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यानुसार, मुंबई विभागीय मंडळातर्फे यंदाही विद्यार्थ्यांना हस्तलिखित प्रश्नपत्रिकेच्या छायाप्रत दिल्याचे मंडळाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने, दर वर्षी हस्तलिखित प्रश्नपत्रिकेच्या छायाप्रत देत असल्याचे मंडळाने सांगितले. (प्रतिनिधी)