Join us  

‘त्या’ चौघांच्या सहभागाचा संभ्रम कायम

By admin | Published: March 20, 2016 2:58 AM

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेच्या चार नगरसेवकांची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली आहे. काही अटींवर त्यांचा जामीन

ठाणे : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेच्या चार नगरसेवकांची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली आहे. काही अटींवर त्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला असला तरी त्यांची महासभेतील उपस्थिती आणि होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्याबाबत न्यायालयाने काय निर्देश दिले आहेत, याची विचारणा शनिवारच्या महासभेत विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी प्रशासनाकडे केली. यावर महापालिकेचे विधी सल्लागार मकरंद काळे यांनी या खटल्यात राज्य शासन अभियोग असल्याने त्याबाबत ठाणे महापालिकेकडे अर्ज आल्यानंतर शासनाचे मार्गदर्शन घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक बोलणे टाळले. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी शनिवारच्या महासभेत हजेरी लावली. परंतु, त्यांनी चर्चेत सहभाग घेतला नाही. इतर तीन नगरसेवकांना जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. - त्या चौघांना महासभेत उपस्थित राहता येणार आहे. परंतु, चर्चेत भाग घेता येणार नाही. प्रशासनाकडे पालिकेने अर्ज दिल्यावर राज्य शासनाकडून मार्गदर्शन घ्यावे लागणार असल्याचे काळे यांनी सांगितले.या प्रकरणातील आरोपींनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधू नये, महापालिकेत येऊ नये, फक्त महासभेला उपस्थित राहू शकतील, अशा अटींवर जामीन दिल्याचे स्पष्ट केले.