मुंबई : भवन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉलतिकीट मिळाले नसल्याची घटना ताजी असतानाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ओळखपत्रही मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या तब्बल ५०० विद्यार्थ्यांना ओळखपत्र मिळाले नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले आहेत.गिरगाव चौपाटी येथील भवन्स कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे परीक्षेला बसता आले नव्हते. त्यातच महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रथम वर्ष पदवीच्या विद्यार्थ्यांना ५ महिन्यांपासून महाविद्यालयाचे ओळखपत्र देण्यात आले नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून महाविद्यालय प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे. यात बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएएफच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काही विद्यार्थ्यांना ओळखपत्र दिले असले तरी यात चुका आहेत. पदवी अभ्यासक्रमाचे प्रथम सत्र संपत आले तरी ओळखपत्र मिळाले नसल्याची नाराजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. जर विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतील तर या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल.- डॉ. मेधा गुप्ते, प्राचार्य, भवन्स महाविद्यालय, गिरगाव चौपाटी
हॉलतिकिटानंतर ओळखपत्रांचाही गोंधळ
By admin | Published: October 25, 2016 4:32 AM