मुंबई : मुंबईत सोमवारी पवई आयटी पार्क सेंटरवर तलाठी भरतीची परीक्षेदरम्यान दिल्या गेलेल्या वेळेपूर्वीच परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून काही उमेदवारांना प्रवेश नाकरण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. तलाठी परीक्षा सुरू असताना घडलेल्या आणखी एका प्रकारामुळे या परीक्षांसाठी कठोर कायद्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया उमेदवार व्यक्त करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा दरवाजा ठोठाविण्याचा निर्णय स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने घेतला आहे. तलाठी भरतीची ऑनलाइन परीक्षा मागील गुरुवारपासून सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाकीटॉकीच्या मदतीने ऑनलाइन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला.परीक्षा स
मन्वय समितीकडून पेपरफुटीवर कायदा करण्यासह विशेष तपास पथकामार्फत सर्व गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारचे दुर्लक्ष असल्याचा दावा समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केला आहे. यामुळेच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करू व राज्यभर आंदोलनही करू, असे त्यांनी सांगितले.