Join us

‘टेस्टिंग लॅब’ अहवालातील संभ्रम टाळणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:06 AM

कोरोना अहवालाबाबत मुंबईकरांमध्ये संभ्रम आहे. एकाच व्यक्तीचा अहवाल एका लॅबमध्ये पाॅझिटिव्ह तर दुसऱ्या लॅबमध्ये निगेटिव्ह येताे. त्यामुळे आपण कोरोना ...

कोरोना अहवालाबाबत मुंबईकरांमध्ये संभ्रम आहे. एकाच व्यक्तीचा अहवाल एका लॅबमध्ये पाॅझिटिव्ह तर दुसऱ्या लॅबमध्ये निगेटिव्ह येताे. त्यामुळे आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत की निगेटिव्ह, याबाबत संबंधित व्यक्तींमध्ये गोंधळ निर्माण होतो. ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी राज्य सरकारने टेस्टिंग लॅबची विश्वासार्हता पडताळणे गरजेचे आहे. तसेच खासगी लॅबमध्ये असलेली दोन-दोन दिवसांची वेटिंग टाळण्यासाठी सरकारी चाचणीची सुविधा घरपोच मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत. हॉटेल, रेस्टॉरंट व कार्यालयांसाठी कोरोना काळात ठोस नियमावली जाहीर करावी, जेणेकरून त्या ठिकाणी होणारे गैरप्रकार टाळता येतील.

- रमेश चव्हाण, फाऊंडर, एमडी, सोहम ग्रुप

...................................................

रोगप्रतिकार क्षमता वाढवणे गरजेचे

केंद्र आणि राज्य सरकार त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळत आहेतच. मात्र नागरिकांनीही त्यांना सहकार्य करत योग, व्यायामासारख्या गोष्टींवर भर देऊन स्वतःला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करावा. कारण कोरोनाची घातकता ही प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे ती वाढविणे हे प्रत्येकाच्या हातात आहे, त्यानुसार नागरिकांनी त्यावर भर देणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोनाच काय तर आपल्याला कोणत्याही व्हायरसशी सहज दोन हात करता येतील.

- संजय मोदी, प्लेटलेट्स डोनर, विकासक

........................................