महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात तरुणांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 05:29 AM2020-03-03T05:29:21+5:302020-03-03T05:29:27+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत एनटी-ड या प्रवर्गात राखीव जागा नसल्याचे निदर्शनास आल्याने, सोमवारी वंजारी युवक संघटनेने मुंबईच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात गोंधळ घातला.

Confusion of youth in Maharashtra Public Service Commission office | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात तरुणांचा गोंधळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात तरुणांचा गोंधळ

Next

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत एनटी-ड या प्रवर्गात राखीव जागा नसल्याचे निदर्शनास आल्याने, सोमवारी वंजारी युवक संघटनेने मुंबईच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात गोंधळ घातला. आयोगाच्या मुंबई कार्यालयात अंडी फेकून कार्यालयातील अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.
पोलीस उपनिरीक्षकाच्या (पीएसआय) ६५० पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षेची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आली. शासन निर्णयाप्रमाणे एनटी-ड (वंजारी) या प्रवर्गासाठी सरळसेवा भरतीसाठी २ टक्के जागा राखीव आहेत. मात्र, जाहिरातीत एकही जागा आरक्षित नाही. एनटी-क प्रवर्गात धनगर, तर एनटी-ड प्रवर्गात वंजारी समाजाचा समावेश होतो. जाहिरातीत ६५० पैकी ४७५ जागा विविध प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. शासन निर्णयाप्रमाणे यापैकी दोन टक्के जागा एनटी-ड प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने, त्यानुसार १३ जागा अपेक्षित होत्या, परंतु या प्रवर्गासाठी जाहिरातीत एकही जागा आरक्षित नाही. एनटी-क प्रवर्गासाठी आरक्षित जागांपैकी ३.५ टक्के म्हणजे २४ जागा आरक्षित असणे अपेक्षित असताना दोनच जागा आहेत. या विरोधात वंजारी समाजातील स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
>विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय भरती प्रक्रियेत एनटी-ड प्रवर्गावरील अन्याय दूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत येत्या २ दिवसांत तातडीने बैठक घेण्यात येईल. शासन निर्णयाप्रमाणे या प्रवर्गासाठी २ टक्के जागा आरक्षित करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी विनंतीही करणार आहे. हे विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास, भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तयारी करत आहेत, याची जाणीव आहे. विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा. - धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

Web Title: Confusion of youth in Maharashtra Public Service Commission office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.