काँग्रेस आघाडी सरकारच्या निधीवर युतीची जाहिरातबाजी! स्वत:ची विशेष कामगिरी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 02:58 AM2017-11-05T02:58:23+5:302017-11-05T02:58:34+5:30
राज्य सरकारच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त ‘मी लाभार्थी’ असे घोषवाक्य देऊन जाहिरात करण्यात आलेल्या शेततळ्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने जुलै २०१४ मध्ये निधी दिला होता.
मुंबई : राज्य सरकारच्या तिसºया वर्धापन दिनानिमित्त ‘मी लाभार्थी’ असे घोषवाक्य देऊन जाहिरात करण्यात आलेल्या शेततळ््यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने जुलै २०१४ मध्ये निधी दिला होता. याशिवाय संबंधित शेतकºयाने कर्ज काढून शेततळ््याचा उर्वरित खर्च भागवला होता. तरीही हे शेततळे आपल्यामुळेच झाल्याची जाहिरात करून, भाजपा-शिवसेना सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यासाठी सरकारने लोकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
शेततळ््याच्या या जाहिरातीमागील वस्तुस्थिती समोर आल्यानंतर विखे म्हणाले, तिसºया वर्धापन दिनानिमित्त राज्य सरकारने सुरू केलेल्या जाहिराती फसव्या, वस्तुस्थितीशी विसंगत आणि अतिशयोक्ती करणाºया आहेत. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील भिरावी येथील शेतकरी शांताराम कटके यांना काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात जुलै
२०१४ मध्ये शेततळ्यासाठी १ लाख ७९ हजार रुपये मंजूर झाले होते. त्यानंतर लगेच पावसाळा सुरू झाला
व पावसाळ्यात शेततळ्याची
उभारणी शक्य नसल्याने त्याचे
काम काही महिन्यानंतर पूर्ण झाले. शिवाय या शेततळ्यासाठी
लागलेली एकूण रक्कम मंजूर निधीपेक्षा कितीतरी अधिक होती. त्यामुळे शांताराम कटके यांनी कर्जही घेतले होते. कटके यांनी अत्यंत परिश्रमाने उभारलेल्या शेततळ््याची खोटी जाहिरात करून त्याचे संपूर्ण श्रेय लाटण्याचा अश्लाघ्य प्रकार राज्य सरकारने केला आहे.
स्वत:ची विशेष कामगिरी नाहीच
भाजपा-शिवसेनेचे सरकार आपल्या कामांची नव्हे, तर काँग्रेस आघाडी सरकारच्याच काळातील योजनांची आणि निर्णयांची जाहिरात करते आहे. या सरकारकडे लोकांना सांगण्यासाठी स्वत:ची अशी कोणतीही विशेष कामगिरी नाही.
नावे बदलून किंवा किरकोळ बदल करून काँग्रेस आघाडी सरकारमधील ज्या योजनांची कशीबशी अंमलबजावणी सुरू आहे, त्याच योजनांचा आज भाजपा-शिवसेना गाजावाजा करीत असल्याचा ठपकाही विखे पाटील यांनी ठेवला आहे.