Join us

आरेच्या मूलभूत सुविधांसाठी भर पावसात कॉंग्रेसच्या उपोषणाला सुरुवात

By मनोहर कुंभेजकर | Published: July 19, 2023 2:24 PM

आज सकाळपासून गोरेगाव (पूर्व) येथील आरे डेअरी समोर भर पावसात बेमुदत उपोषण आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई : आरेतील झोपडपट्टी दुरुस्ती, लाईट मीटर साठी परवानगी मिळावी, आरेतील अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था दूर करावी, तसेच मयूर नगर येथील दुकानदारांवर अन्यायकारक तोडक कारवाई, परवाना धारक तबेलेवर होत असलेल्या अन्याय बाबत व इतर प्रश्नांसाठी याबाबत आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी उत्तर पश्चिम जिल्हा कॉंग्रेस यांच्यावतीने आज सकाळपासून गोरेगाव (पूर्व) येथील आरे डेअरी समोर भर पावसात बेमुदत उपोषण आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा प्रा वर्षा गायकवाड ,माजी खासदार संजय निरुपम ,जिल्हा अध्यक्ष क्वाव्हई डायस ,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांच्या आदेशानुसार आरे डेयरी समोर आज सकाळी बेमुदत उपोषणाला सुरवात झाली.

या समस्यां बाबत संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली नुकताच आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर अलीकडेच  मोर्चा सुध्दा काढण्यात आला होता.मात्र  आरेचे सीईओ आणि दुग्धविकास विभागाने समस्यांची दखल घेतली नसल्याबद्धल सदर बेमुदत उपोषण आयोजित केल्याची माहिती मुंबई प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी लोकमतला दिली.जो पर्यंत दुग्धविकास विभाग व आरे प्रशासन योग्य निर्णय देत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहील अशी माहिती त्यांनी दिली.

या उपोषणाला सुनिल कुमरे,मुंबई एस सी विभाग कॉंग्रेसचे महासचिव जयराम मुरगन, ५२चे कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष राहुल उगले,५३चे ब्लॉक अध्यक्ष सूरज गुप्ता,स्थानिक नागरिक हिरालाल सिंह,सुरेश चौधरी, बरकत शेख आदी बसले आहेत. या उपोषणाबाबत विचारले असता, आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी सांगितले की, नियमानुसार आरे प्रशासनाने कारवाई केली आहे.

टॅग्स :मुंबई