Join us

आगामी विधानसभेसाठी काँग्रेसचे सामूहिक नेतृत्व; मुकुल वासनिक, राजीव सातव यांच्याकडे धुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 10:00 PM

विदर्भात रणनीती आखण्यासाठी काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई असे विभागवार पक्षाच्या नेत्यांकडे निवडणुकांची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये मुकुल वासनिक, राजीव सातव, अविनाश पांडे यांचा समावेश आहे.  

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भात रणनीती आखण्यासाठी काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व आर. सी. खुंटिया यांच्याकडे दिले आहे. अविनाश पांडे यांच्याकडे मुंबई विभाग आणि निवडणूक नियंत्रण कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम आणि कोकण विभाग रजनी पाटील यांच्याकडे दिला आहे. तसेच,  मराठवाड्याची जबाबदारी राजीव सातव यांच्याकडे देण्यात आली आहे. 

दरम्यान, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासारख्या राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडे आगामी विधानसभा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाल्याचे समजते. 

टॅग्स :काँग्रेसविधानसभा