मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने बुधवारी फेरीवाला सन्मान मार्चची हाक दिली आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याचे कारण देत पोलिसांनी फेरीवाला सन्मान मार्च काढण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र कोणत्याही घोषणांविना दादरमधील काँग्रेस कार्यकर्ते व फेरीवाले सकाळी १० वाजता सन्मान मार्च काढणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस नितीन पाटील यांनी दिली. आयडियल बूक डेपोपासून सुरू होणारा मार्च कबुतरखान्याजवळ संपेल.
दादरमध्ये आज काँग्रेसचा फेरीवाला सन्मान मार्च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 6:51 AM