नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील ३६ पैकी १९ जागांवर संभाव्य उमेदवारांच्या नावांवर काँग्रेस छाननी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, नावांची घोषणा करण्यात आलेली नाही.मुंबईत शुक्रवारी होणाऱ्या प्रदेश काँग्रेस कोअर गटाच्या बैठकीत उरलेल्या जागांवर चर्चा होईल. बैठकीचा अहवाल केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविण्यात येईल. दिल्लीतूनच उमेदवारांची घोषणा होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांपासून छाननी समितीची बैठक दिल्लीत सुरूआहे. समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, मुंबई शहराध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ. के.सी. पाडवी बैठकीला उपस्थित होते.विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यावर बैठकीत सर्वच नेत्यांचे एकमत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांना जागावाटप केल्यावर उरलेल्या जागांसाठी उमेदवारांची प्राथमिक यादी तयार आहे. कोअर समितीची बैठक प्रामुख्याने मुंबईसाठी बोलाविण्यात आली होती, असे एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.सत्यजित यांची टीकाऊर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या विचारसरणीशी ठाम आहेत. त्या दुसºया पक्षात जाणार नाहीत. मात्र, त्यांना पक्षात मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. अप्रत्यक्षपणे पक्षांतर्गत गटबाजीवर त्यांनी टीका केली.