Join us  

मोठी बातमी! बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 11:09 AM

विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. 

मुंंबई- विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन  काँग्रेस नेतेबाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून  अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन गटबाजी समोर आली होती. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आता विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले आहे.  आता या प्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगण्यात येत आहे.

धक्कादायक! हॉस्टेलच्या जेवणातून 137 विद्यार्थ्यांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे, आणि आजच्याच दिवशी त्यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बाळासाहेब थोरात यांनी असा कोणताही राजीनामा दिल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही. त्यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

मला त्यांनी दिलेल पत्र दाखवा. बाळासाहेब थोरात यांची तब्येत चांगली नाही त्यामुळे ते कोणाशी बोलत नाहीत. हे काँग्रेस विरोधात राजकारण सुरू आहे, राज्यात काँग्रेसला यश मिळत आहे, असंही नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :काँग्रेसबाळासाहेब थोरातनाना पटोलेसत्यजित तांबे