बंडखोर आमदारांच्या भेटीसाठी काँग्रेसचे 'संकटमोचक' मुंबईत, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 09:11 AM2019-07-10T09:11:19+5:302019-07-10T14:04:05+5:30
मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र या बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेतेची मागणी केली आहे.
मुंबई : कर्नाटकातील बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेता डीके शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्या रेनेसन्स हॉटेलमध्ये डीके शिवकुमार यांना पोलिसांनी जाऊ दिले नाही.
यावेळी रेनेसन्स हॉटेलच्याबाहेर पत्रकारांशी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले,' याठिकाणी मी रुम बूक केली आहे. माझे मित्र याठिकाणी थांबले आहेत. छोटीशी समस्या असून यावर चर्चा करायची आहे. आम्ही लगेच यावर घटस्फोट घेऊ शकत नाही. तसेच, धमकवण्याचा प्रश्नच नाही, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि एकमेकांचा आदरही करतो.'
DK Shivakumar,outside Renaissance Mumbai Convention Centre Hotel: I've booked a room here. My friends are staying here.There has been a small problem, we've to hold negotiations.We can't go for a divorce immediately. There is no question of threatening, we love&respect each other pic.twitter.com/RRcazlhbRq
— ANI (@ANI) July 10, 2019
याचबरोबर, डीके शिवकुमार हॉटेलजवळ आल्यानंतर भाजपा आणि जनता दलाचे (एस) नेते नारायण गौडा यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. याशिवाय, मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र या बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेतेची मागणी केली आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.
Police escorts Karnataka Minister DK Shivakumar away from the gates of Renaissance - Mumbai Convention Centre Hotel where 10 rebel Congress-JD(S) MLAs are staying. The MLAs had written to Police stating"We've heard CM&DK Shivakumar are going to storm the hotel,we feel threatened" pic.twitter.com/KCPmJzZjPH
— ANI (@ANI) July 10, 2019
जनता दलाचे (एस) बंडखोर आमदार नारायण गौडा यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि डीके शिवकुमार मंगळवारी आमदारांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येत आहेत. यामुळे आम्ही सर्व आमदारांनी मिळून पोलिसांना पत्र लिहिले आहे. यामध्ये आम्ही सुरक्षा मागितली आहे. कारण, एचडी कुमारस्वामी आणि डीके शिवकुमार आम्हाला भेटण्यासाठी सक्ती करु शकणार नाहीत.'
#Mumbai: Security deployed outside Renaissance - Mumbai Convention Centre Hotel, where 10 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs are staying. Karnataka Minister DK Shivakumar is currently on his way from the airport to the hotel. pic.twitter.com/1jidVLdmcb
— ANI (@ANI) July 10, 2019
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जनता दल (एस)च्या आमदारांनी राजीनामे देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
Mumbai Police: Karnataka Minister DK Shivakumar will not be allowed inside hotel where 10 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs are staying. He will not be stopped before the gates of the hotel. pic.twitter.com/CUAG1RrsNG
— ANI (@ANI) July 10, 2019
Karnataka Minister DK Shivakumar, in #Mumbai: Let Mumbai Police or any other force be deployed. Let them do their duty. We've come to meet our friends. We were born together in politics, we will die together in politics. They are our party men. We have come to meet them. pic.twitter.com/F7fCh7i6kh
— ANI (@ANI) July 10, 2019
कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी टाकला 'असा' डाव, बंडखोर आमदारांसमोर निर्माण झाला पेच
कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. विधानसभेतील कुठलाही बंडखोर आमदार मला भेटलेला नाही. तसेच 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांचे राजीनामे हे नियमांच्या चौकटीत बसणारे नसल्याचे त्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच मी या आमदारांना भेटण्यासाठी वेळही दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कर्नाटकमधील राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले आहे. तसेच आमदारांच्या राजीनाम्याबाबतही संशय निर्माण झाला आहे.
'मी संविधानाचे पालन करेन. तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीशी माझा काहीही संबंध नाही. मी संविधानानुसार काम करत राहीन. आतापर्यंत तरी कुठल्याही आमदाराने माझ्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितलेला नाही. जर कुणी मला भेटू इच्छित असेल तर मी माझ्या कार्यालयात उपस्थित असेन. मला जबाबदारीने निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी नियमांनुसार कुठलीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही,'' असे कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सांगितले.